Fri, Sep 25, 2020 17:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई : मराठा समाजाच्या नेत्यांचे आंदोलन (video)

नवी मुंबई : मराठा समाजाच्या नेत्यांचे आंदोलन (video)

Last Updated: Sep 16 2020 12:49PM
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा

नवी मुंबईत मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि समन्वयकांनी आज (दि.१६) सकाळी साडे नऊ वाजता वाशी शिवाजी महाराज चौकात आंदोलनाला सुरूवात केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन पोलीस उपायुक्त आणि दहा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

अधिक वाचा :  मुंबईत दररोज ५०० किलो ड्रग्ज फस्त!

आज सकाळी माथाडी भवन येथून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी केली. मराठा समाजाचे नवी मुंबईतील समन्वयक आणि पदधिकारी यांनी वाशी शिवाजी महाराज चौकापर्यंत पोहचले. या चौकात बसून मराठा नेते नरेंद्र पाटील यांच्यासह पदधिकाऱ्यांनी आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी न्यायालयात सरकारने कमी पडू नये, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

अधिक वाचा : युट्यूबने लहान व्हिडिओ करण्यासाठी आणली भन्नाट आयडिया; वेगळ्या ॲपची गरज नाही!

सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहेत. यात अनेक संघटना राजकीय पक्ष आणि, नेते वेगवेगळ्या आंदोलनाची हाक देत आहेत मात्र मराठा आरक्षण पुरवत मिळवण्यासाठी एका नियोजनबद्ध आंदोलन करण्यासाठी तीन दिवसापूर्वी माथाडी भवनात समन्वयकांची बैठक घेण्यात आली होती.

 "