Mon, Sep 28, 2020 08:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षणात महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये

शिक्षणात महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये

Last Updated: May 23 2020 12:59AM

संग्रहित छायाचित्रमुंबई ः पुढारी वृत्तसेवा

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात’ यंदाही महाराष्ट्र राज्याने पहिल्या पाच राज्यात येण्याचा मान मिळवत प्रथम श्रेणी मिळवली आहे. 2017-18च्या तुलनेत राज्याने 102 गुणांची मजल मारत 802 गुण मिळवले आहेत. सर्वप्रथम नीती आयोगाने 2015-16 व 2016-17च्या माहितीच्या आधारे शालेय शिक्षण दर्जा निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला होता. याचाच आधार घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2018-19चा कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक जाहीर केला. यात महाराष्ट्राने यंदा चांगली कामगिरी केली आहे. 2018-19मध्ये महाराष्ट्रासह झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी 2017-18पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. 

सरकारी शाळा आर्थिक, भौतिक व शैक्षणिकदृष्ट्या अध्यापही पूर्णता सक्षम नाहीत. या सर्व सुविधा राज्यांनी शाळांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, शाळांच्या दर्जाचे मूल्यमापन करणे, शैक्षणिक सुधारणा करून योग्य ते शैक्षणिक नियोजन करणे, निधीची उपलब्धता इत्यादीच्या व्यापक उद्देशाने काही मापदंड आखून प्रत्येक राज्याची क्रमवारी निश्चितीसाठी कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक आखून क्रमवारी जाहीर करण्यात आली.

असे झाले मूल्यांकन

भौतिक सोयी व सुविधा

समता शासना व्यवस्थापन प्रक्रिया

अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता शाळेची उपलब्धता

दोन वर्षांची तुलना

राज्य    2017-18    2018-19

गुजरात    810    870

केरळ    825    860

दिल्ली    745    830

महाराष्ट्र    700    802
 

 "