Mon, Sep 28, 2020 08:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम

परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम

Last Updated: Jul 17 2020 1:46AM

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या वाढत्या भादूर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महासाथ नियंत्रण कायदा हे दोन कायदे इतर सर्व कायद्यांना अधिक्रमित असून त्याअंतर्गतच परीक्षा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याची कृती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्या सारखे असल्याचे प्रतिज्ञापत्रच राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने उच्च न्यायालयात सादर केले. 

मुंबई : फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला

कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने परीक्षांबाबत १९ जून रोजी एका अध्यादेशाद्वारे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्ष रद्द  केल्या,  तर अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा मात्र कालांतराने घेण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णया विरोधात पुण्यातील एका निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांच्यावतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान देणारी जनहित याचिका दाखल केली. न्यायमूर्ती  ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला एका आठवड्यात  भूमीका मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने प्रतिज्ञापत्र सादर  करून राज्य सरकारच्या परिक्षा न धेण्याच्या  निर्णयाचे समर्थन केले आहे. 

टेन्शन वाढलं! देशात कोरोनामुळे ९९ डॉक्टरांचा मृत्यू; रेड अलर्ट जारी

आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महासाथ नियंत्रण कायदा हे दोन कायदे इतर सर्व कायद्यांना अधिक्रमित असून त्याअंतर्गतच कोरोनाचे संकट राज्यभर पसरले असताना  सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा हा राज्य सरकारसाठी सध्या प्राथमिकता आणि प्राधान्याचा बनलेला आहे. अशा स्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यापीठ, महाविद्यालयांचे कर्मचारी वर्ग सगळ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यातच  कोरोनाचे संकट कधी संपुष्टात येईल याबद्दल तूर्त तरी  काहीच सांगता येत नाही. ते संपुष्टात येण्याची वाट पाहत परीक्षा सतत पुढे ढकलणे अव्यवहार्य आहे. याचा  सारासार विचार करूनच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महासाथ नियंत्रण कायद्याअंतर्गत राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा राज्य सरकारने केला आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

 "