Fri, Oct 02, 2020 00:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एमबीए, एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल उद्या

एमबीए, एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल उद्या

Last Updated: May 22 2020 6:34PM

file photoमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल उद्या (शनिवार) सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. राज्यभरात असलेल्या सुमारे ३६ हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्व परीक्षा १४ व १५ मार्च रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसले होते.

 हे गुणवत्तेनुसार हे विद्यार्थी ३६ हजार जागांवर प्रवेश होणार आहे. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता या परीक्षेचा निकाल जाहीर होईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

गतवर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून 1 लाख 11 हजार 846 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 2 हजार 851 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर 20 विद्यार्थ्यांना 200 पैकी 150 हून अधिक गुण मिळाले होते. 126 ते 150 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 677 इतका होता. 100 पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.

गेल्यावर्षी याच प्रवेश परीक्षेत बोगस प्रवेश आढळल्याने यंदा ‘एमबीए’, ‘एमएमएस’ प्रवेशासाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची ‘सीईटी’, ‘सीमॅट’ आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी ‘कॅट’ परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेश परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, असे या अगोदरच सीईटी सेलने सष्ट केल्याने यंदा प्रवेशात मोठी चुरस होणार आहे.

 "