Sat, Feb 27, 2021 06:44
करिना कपूर आलिशान घरामध्ये झाली शिफ्ट; तिने शेअर केलेले photos पाहिलेत का?

Last Updated: Jan 17 2021 8:45AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

करीना कपूरने नवीन घर घेतले आहे का? होय, करीनाने तिच्या नवीन घराच्या काही झलक चाहत्यांना इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केल्या आहेत. त्यांचे हे घर त्याच्या जुन्या घरापासून थोड्या अंतरावर आहे. परंतु, हे घर जुन्या घरापेक्षा बरेच मोठे आहे. (Kareena Kapoor Khan shares a glimpse of her new house) 

इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये करिनाने आपल्या खोलीचा एक फोटो शेअर केला असून तो तिने आपल्या बेडवरून क्लिक केला आहे. या फोटोमध्ये पलंगाचा एक कोपरा, गडद हार्डवुडचा मजला, छतासारखा उघडलेला काचेचा दरवाजा दिसत आहे. टेरेस लुक चेसबोर्ड पद्धतीने दिसून येत आहे. काही फ्रेम्समध्ये करीना कपूर, सैफ अली खान आणि तिचा मुलगा तैमूरची छायाचित्रे एका भिंतीवर आहेत. फोटो शेअर करताना करिना म्हणते की, “एक नवीन सुरुवात!” चाहत्यांनी करीना कपूरच्या नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

करीना कपूरची बहीण करिश्मा कपूरनेही करिनाच्या नवीन घराच्या टेरेसवरून एक फोटो शेअर केला आणि पोस्टला कॅप्शन देऊन लिहिले की, “नवीन सुरुवात नेहमीच खास असते.” आतापर्यंत करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे कुटुंब फॉर्च्यून हाइट्समध्ये राहत होते, परंतु आता ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत.