Wed, May 19, 2021 04:29
आवाज उठवायला अनेक व्यासपीठे उपलब्ध; ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड केल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

Last Updated: May 04 2021 1:40PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाले आहे. वादग्रस्त ट्विटमुळे ट्विटरने अकाऊंटवर कारवाई केल्याची शक्यता आहे. याबाबत ट्विटरकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यानंतर कंगनाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, माझा आवाज उठवायला अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत.  \

Image

दोन दिवसांपूर्वी कंगनाने ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून ट्विट केले होते. निसर्गाकडून किती ऑक्सिजन घेणार, यावर कंगनाने निशाणा साधला होता. कंगना राणावतने नवे ऑक्सिजन प्लांट्स बनवण्यासाठी वातावारणातील जबरदस्ती ऑक्सिजन घेण्यावर आक्षेप नोंदवला होता. ती म्हणाली होती आपल्याचं चुकांमधून आपण काहीचं शिकलो नाही. 

कंगनाने पोस्ट शेअर करून लिहिलं, "प्रत्येक जण अधिकाधिक ऑक्सीजन प्लांट्स उभारत आहेत. अनेक टन ऑक्सीजन सिलेंडर बनवण्यासाठी आम्ही निसर्गातील ऑक्सीजनची भरपाई कशी करणार? आपण वातावरणातून जबरदस्तीने ऑक्सिजन घेत आहोत? असं वाटतं की, आपणचं केलेल्या चुकांमधून, नैसर्गिक आपत्तीमधून आपण काहीचं शिकलेलो नाही. आपल्याला अधिकाधिक झाडे लावायला हवी."

​​​​​​​कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये म्हटले होते, "लोकांना अधिकाधिक ऑक्सीजन उपलब्ध करण्याच्या घोषणेबरोबरचं सरकारला नेचर रिलीफसाठीही घोषणा करायला हवी. जे लोग या ऑक्सीजनचा वापर करत आहेत, त्यांना एअर क्वॉलिटी सुधारण्यासाठी काम करण्याचा संकल्पदेखील घ्यायला हवा...झाडे लावा.''