Fri, Oct 02, 2020 00:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले? शय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो'!

'जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले? शय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो'!

Last Updated: Sep 16 2020 3:25PM
मनाली : पुढारी ऑनलाईन

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत खासदार जया बच्चन यांनी गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या वादावर संताप व्यक्त केला. खाल्ल्या ताटाला छिद्र पाडण्याचे काम काही लोक करत असल्याचा आरोप जया बच्चन यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर कंगना आणि जया बच्चन यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले. कंगनाने बॉलीवूडसंदर्भात नवा गोप्यस्फोट करत जया बच्चन यांच्या आरोपाला सनसनाटी प्रत्युत्तर दिले आहे. 

काय म्हणाली कंगना? 

जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आमि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा. तोसुद्धा हिरोसोबत शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्राधान्य असलेल्या भूमिकांनी सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे तुमचे नाही असा टोलादेखील तिने जया बच्चन यांना लगावला. 

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणादरम्यान, ड्रग्ज तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जया बच्चन यांनी नाव न घेता रवी किशन यांनी उचलून धरलेल्या मुद्याचा समचार घेतला. 

जया बच्चन यांनी काही लोक ज्या ताटात खातात, त्याच ताटाला छिद्र करतात, ही चुकीची गोष्ट आहे.' अशी चिंता व्यक्त केली. तसेच, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवले जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिले आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत. मी याचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

जया बच्चन यांच्या ताटाचा मुद्दा उचलुन धरत कंगनाने जया बच्चन यांच्यावर निशाणा साधाला आहे. कंगनाच्या या नव्या ट्विटला जया बच्चन काय उत्तर देतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

 "