Fri, Sep 25, 2020 17:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'जया बच्चन ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण करताहेत'

'जया बच्चन ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण करताहेत'

Last Updated: Sep 17 2020 11:05AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. राज्यसभेत खासदार रवी किशन यांनी ड्रग्ज संदर्भात मुद्दा मांडत चिंता व्यक्त केली मात्र, त्यांच्या या मुद्याला फटकारत खासदार जया बच्चन यांनी ज्या ताटात खाता त्याच ताटात छेद करतात, असा आरोप केला. त्यांच्या या आरोपानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, अभिनेत्री जया प्रदा यांनी या वादात उडी घेत रवी किशन यांची पाठराखण केली आहे. 

काय म्हणाल्या जया प्रदा

मी युवकांना ड्रग्ज तस्करी आणि व्यसनासंदर्भाच्या समस्येपासून वाचवण्याच्या रवी किशन यांच्या भूमिकेचं समर्थन करते. आपल्याला ड्रग्ज वापराबाबत आवाज बुलंद करण्याची गरज आहे. तसेच आपल्या युवा पिढीला यातून वाचवण्याची देखील गरज आहे, असे सांगत ड्रग्ज प्रकरणावरून जया बच्चन या राजकारण करत असल्याचे जया प्रदा यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन

खासदार रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर जया बच्चन यांनी संसदेत बोलताना हल्लाबोल केला होता. त्या म्हणाल्या होत्या की की, 'चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे अत्यंत लज्जास्पद आहे. मी कोणाचंही नाव घेत नाहीये. ते स्वतःही याच इंडस्ट्रीत काम करतात. 'जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है.' ही चुकीची गोष्ट आहे. मला आता सांगावं लागत आहे की, इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे.'

रवी किशन काय म्हणाले होते ?

रवी किशन यांनी लोकसभेत सोमवारी ड्रग्ज संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे वाढते प्रमाण याबाबत रवी किशन यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्जचे सेवन करणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करताना रवी किशन यांनी एनसीबीचे कौतुकही केले. “भारतीय सिने जगतात ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. या प्रकरणी काही जणांना अटकही केली आहे. एनसीबीही चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य पार पाडत आहे” अशा शब्दांत रवी किशन यांनी एनसीबीचे कौतुक केले होते.

 "