Fri, Oct 02, 2020 00:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे वाहतूक रूळावर, सोमवारपासून धावणार २०० ट्रेन

रेल्वे वाहतूक रूळावर, सोमवारपासून धावणार २०० ट्रेन

Last Updated: May 31 2020 7:26PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच रेल्वे वाहतूक रूळावर येणार आहे. उद्या, सोमवारपासून असंख्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी २०० ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष श्रमिक ट्रेन तसेच वातानुकूलित ट्रेनव्यतिरिक्त या ट्रेन संचालित केल्या जातील. २१ मे पासून या ट्रेनसाठी तिकीट आरक्षणाला सुरुवात करण्यात आली होती.  

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून १८, निझामुद्दीनवरून ९, आनंद विहार स्टेशनवरून ५, दिल्ली जंक्शन वरून ३, तर दिल्ली सराय रोहिल्ला स्टेशनवरून २ ट्रेन रवाना होतील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

निझामुद्दीन-जबलपुर (जबलपूर एक्सप्रेस), दिल्ली-लखनउ (लखनउ मेल), हजरत निझामुद्दीन-सिंकदराबाद (दुरंतो एक्सप्रेस) तसेच इतर महत्वाच्या गाड्यांचा त्यात समावेश आहे. या ट्रेनसाठी प्रवाशांना आता चार महिन्यांपूर्वीचे आरक्षण करता येणार आहे. 

१ जून पासून धावणा-या रेल्वेमधून प्रवास करणा-यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहील. या ट्रेनमध्ये आरक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाच्या संकेतस्थळासह मोबाईल अँप, रेल्वे स्टेशन काउंटर, पोस्ट ऑफिस , प्रवासी तिकीट सुविधा केंद्र, अधिकृत एजेंट, प्रवासी आरक्षण यंत्रणा तसेच सुविधा केंद्रावरून तिकीट आरक्षित करता येईल. कुठल्याही प्रवाशाला अनारक्षित तिकीट (यूटीएस) देण्यात येणार नाही. यासोबतच या ट्रेनमध्ये ​तिकीट​ निरीक्षकाला ​प्रवासादरम्यान तिकीट देण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. 
आरएसी तसेच प्रतिक्षा यादीतील तिकीट विद्यामन नियमानूसारच देण्यात येईल. पंरतु, वेटिंग ति​कीट असलेल्यांना गाडीत प्रवेश दिला जाणार नाही. विद्यमान नियमानूसार वातानुकूलित १ मध्ये २०, एसी-२ मध्ये ५०, एसी-३ मध्ये १०० तसेच स्पीपर डब्यात २०० वेटिंग तिकीट बुक करण्यात येईल. 

प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालावे लागले. गंतव्य स्थानावर पोहचल्यानंतर प्रवाशांना संबंधित राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. थर्मल स्कनिंग करीत प्रवाशांना ९० ​मिनिटे अगोदर स्टेशनवर पोहचावे लागेल. आजारी प्रवाशाला प्रवासाची परवानगी देण्यात येणार नाही. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश दिला जाईल, हे विशेष. सर्वांना आरोग्य सेतु अँप डॉउनलोड करावे लागेल.

 "