होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोदी सरकारला २० वर्षातील सर्वांत मोठा झटका बसणार?

मोदी सरकारला २० वर्षातील सर्वांत मोठा झटका बसणार?

Last Updated: Jan 25 2020 2:22AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भीषण मंदीकडे वाटचाल करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक चिंताजनक बातमी आली आहे. गेल्या २० वर्षात प्रथमच केंद्र सरकारला मिळणारा कॉर्पोरेट आणि प्राप्तिकर घटण्याची शक्यता आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने वरिष्ठ कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधाराने ही माहिती दिली आहे. 

अधिक वाचा : टी-२० च्या इतिहासात 'असे' पहिल्यांदाच घडले!

मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात थेट कराच्या माध्यमातून १३.५ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल, अशी आशा सरकारला होती. यंदाच्या आर्थिक वर्षात थेट कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात १७ टक्क्यांची वाढ सरकारला अपेक्षित होती. मात्र, मंदीमुळे गुंतवणूक आणि नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. यामुळे करात घट झाली आहे. कर वसूलीसाठी संपूर्ण प्रयत्न करुनही यंदाच्या वर्षात थेट कर संकलन ११.५ लाख कोटींच्या खालीच राहील, असा दावा आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना केला. 

अधिक वाचा : शरद पवारांच्या दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेत कपात

कर विभागाला २३ जानेवारीपर्यंत केवळ ७.३ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आलं आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत कर विभागानं वसूल केलेली रक्कम ५.५ टक्क्यांनी जास्त होती, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पहिल्या तीन तिमाहींमध्ये कंपन्यांकडून आगाऊ स्वरुपात कर गोळा केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या शेवटच्या तीन महिन्यांत वार्षिक कराच्या ३० ते ३५ टक्के रक्कम जमा होते, असं आकडेवारी सांगते. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीतून हे अधोरेखितदेखील झालं आहे. 

अधिक वाचा :  मासिक पाळीविषयीचे गैरसमज