Sun, Sep 20, 2020 10:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाशी लढा; ठाकरे सरकार रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार

कोरोनाशी लढा; ठाकरे सरकार रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार

Last Updated: Jun 06 2020 3:28PM

आरोग्यमंत्री राजेश टोपेमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. या कोरोनाविरोधातील लढ्यात ठाकरे सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच प्रयोगशाळा, प्राणी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये आशादायक परिणाम मिळाला असल्याचेही टोपे यांनी सांगितले. 

स्पाईस जेटची विमान कंपनीची शिडी इंडिगो विमानाच्या पंखात घुसली!

तसेच रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला होता. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाकडून घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनीही भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी घेतली जाईल असे सांगितले होते. 

आदिवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदिराकडून १० कोटींचा निधी

रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करण्यासंदर्भात टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यांनी यावेळी “महाराष्ट्र शासन रेमडेसिविरचे १० हजार व्हायरल इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो”. असे म्हटले आहे. तर “जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावर उपचारादरम्यान रेमडेसिविरचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असे सुचवले होते. रेमडेसिविरचे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केल्याचेही टोपे यांनी सांगितले. 

 "