Tue, Sep 29, 2020 09:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमित शहांच्या कोरोना टेस्टबद्दलचे 'ते' ट्विट डिलीट

अमित शहांच्या कोरोना टेस्टबद्दलचे 'ते' ट्विट डिलीट

Last Updated: Aug 09 2020 2:03PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनावर मात केली आहे. भाजपा नेते मनोज तिवारी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. मात्र, काही कालावधीनंतर मनोज तिवारी यांनी अमित शहा यांच्या संदर्भात केलेले ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे सर्वांची संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. 

'देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे' असे मनोज तिवारी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर हे ट्विट काही तासातच डिलीट करण्यात आले. त्यांच्या या ट्विटनंतर गृहमंत्रालयाने अमित शाह यांची कोणतीही करोना चाचणी झालेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अमित शाह करोनामुक्त झाले आहेत की नाहीत याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.

२ ऑगस्टला खुद्द अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली होती. यासोबतच शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना स्वतःची कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ५३ हजार ११  वर पोहोचली आहे. त्यापैकी ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १४ लाख ४० हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४३ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 "