मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यात 21 ऑक्टोबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यास खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणार्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.
सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे सुट्टी किंवा सवलतीस पात्र असतील.