Thu, Oct 01, 2020 18:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही

Last Updated: Dec 07 2019 2:17AM
मुंबई : प्रतिनिधी
कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता. नवलखा हे काश्मीर येथे सत्यशोधन पडताळणी समितीच्या वतीने एका कामासाठी गेले होते तर माओवाद्यांकडे काम करत असताना नवलखा हे शांततादूत म्हणून काम पाहत होते. अशी व्यक्ती देशाविरोधात कशी कारवाई करू शकते, असा सवाल अ‍ॅड. युग चौधरी यांनी शुक्रवारी उपस्थित केला. 

नवलखा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अ‍ॅड. चौधरी यांनी आज युक्तिवाद पूर्ण केला. भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी हायकोर्टात अर्ज केला. हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला, परंतु 12 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. ही मुदत संपल्याने त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 

अ‍ॅड. चौधरी यांनी बाजू मांडताना नवलखा यांच्या विरोधातील सर्व कागदपत्रे ही बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करण्यात येतात. त्यामुळे आम्हाला त्यावर बाजू मांडता येत नसल्याचा दावा केला. तसेच नवलखा हे काश्मीर येथे सत्यशोधन समितीच्या वतीने गेले होते. 

 नवलखा यांच्या पुस्तकांची अनेक मान्यवरांनी दखल घेतली असून नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनीही स्तुती केली आहे, अशी व्यक्ती देशाविरोधात कशी कारवाई करू शकते, असा सवाल उपस्थित करत चौधरी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. 

 "