Fri, Sep 25, 2020 18:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात, वादळी‌ वाऱ्यासह मुसळधारेचा इशारा

मुंबईत वादळी‌ वाऱ्यासह मुसळधारेचा इशारा

Last Updated: Aug 14 2020 11:16AM

संग्रहीत छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत‌ मध्यरात्रीपासून‌ सुरू असलेल्या पावसाच्या सरींनी सकाळपासून जोरदार पावसाचे रूप घेतले आहे. हवामान विभागाने मुंबई शहरासह उपनगराला शुक्रवारसाठी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

अधिक वाचा : देशात एका दिवसात कोरोनाने १ हजार रुग्णांचा मृत्यू

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात व उपनगरात  शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय दिवसभर‌ ४५ ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे‌ वाहतील. मुंबईत वाऱ्याचा वेग ६० किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना?; शिवसेनेचा सवाल 

मुंबईतील‌ समुद्रात भरतीमुळे सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उंच लाटा उसळण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सायंकाळच्या सुमारास‌ समुद्रकिनारी फेरफटका मारण्यास जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

अधिक वाचा : मुंबई, ठाण्यात कोरोनाची पिछेहाट

 "