Wed, Aug 12, 2020 01:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस, अनेक भागांत पाणी साचले

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस, अनेक भागांत पाणी साचले

Last Updated: Jul 05 2020 11:22AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून आज (दि. 5) सकाळी नऊ ते दहा यात एक तासात अंधेरी पूर्वेला 44 मिमी तर, विलेपार्ले व विक्रोळीत सर्वाधिक 43 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागात काही ठिकाणी पाणी साचले होते.

मुंबईत पाऊस सक्रिय झाला असून शहर पूर्व व पश्चिम उपनगरात रविवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हिंदमाता, विलेपार्ले, अंधेरी व मरोळ आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. 5 ते 6 ठिकाणी किरकोळ शॉर्टसर्किटच्या घटना वगळता अन्य कोणतीही दुर्घटना झालेले नाही. 

शहरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. अंधेरी, विलेपार्ले व विक्रोळीत सकाळी साडेनऊच्या सुमारास काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. बांद्रा नॅशनल कॉलेज व एस व्ही रोड, लिंकिंग रोड येथील बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

पावसाची नोंद पुढीलप्रमाणे...

शहर परिसर...

धारावी : 32 मिमी
माटुंगा : 26 मिमी
रावळी कॅम्प : 24 मिमी
दादर : 20 मिमी
वडाळा : 19 मिमी
वारली : 16 मिमी

पूर्व उपनगर परिसर...

विक्रोळी : 43 मिमी
चेंबूर : 40 मिमी
कुर्ला : 37 मिमी
गोवंडी : 32 मिमी
भांडुप : 25 मिमी
मुलुंड : 21 मिमी

पश्चिम उपनगर परिसर...

अंधेरी पूर्व : 44 मिमी
विलेपार्ले : 43 मिमी
मरोळ : 39 मिमी
सांताक्रुझ : 37 मिमी 
वेसावे : 36 मिमी
कूपर हॉस्पिटल : 32 मिमी
बांद्रा : 31 मिमी
अंधेरी पश्चिम : 30 मिमी
दिंडोशी : 23 मिमी