Mon, Nov 30, 2020 13:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावचे सार्वजनिक मैदान सर्वांसाठी खुले करा

गोरेगावचे सार्वजनिक मैदान सर्वांसाठी खुले करा

Last Updated: Oct 20 2019 2:03AM
मुंबई : प्रतिनिधी

क्रिकेट कोचिंगच्या नावाखाली ताब्यात घेतलेले गोरेगावातील सार्वजनिक मैदान ताबडतोब खुले करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भाजपच्या उमेदवार विद्या ठाकूर यांच्या व्हिनस स्पोर्टस् अकादमीला दिला. सार्वजनिक खेळाच्या मैदानावर कोणा एकाची मक्तेदारी नाही ते सवार्ंसाठी खुले आहे. अशा मैदानाचा वापर करण्यापासून सर्वसामान्यांना रोखता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दिला.

गोरेगांव पे्रमनगर येथील महापालिकेचे सार्वजनिक खेळाचे मैदान व्हिनस कल्चरल असोसिएशनला देखभालीसाठी दत्तक देण्यात आले होते. या असोसिएशने व्हिनस स्पोर्टस् क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून आठवड्यातून चार दिवस काही ठराविक तास हे मैदान सर्वसामान्य लोकांना वापरण्यासाठी  मनाई केली होती. त्याविरोधात गोरेगाव येथील रहिवाशांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते सचिन चव्हाण यांच्यावतीने अ‍ॅड. हर्षदा साठे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणीवेळी अ‍ॅड. हर्षदा साठे यांनी या महापालिकेच्या खुल्या मैदानाचा व्हिनस स्पोर्टस क्रिकेट अकादमीने ताबा घेतला.  आठवड्यातून चार दिवस मंगळवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेसाठी भरमसाट फी घेऊन क्रिकेट कोचिंग द्यायला सुरुवात केली. या काळात अन्य लोकांना या मैदानाचा वार करण्यास करण्यास मनाई केली, या बाबीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची न्यायालयाने गंभीर दखल घेत  सावर्र्जनिक मैदानावर विशिष्ट वेळ विशिष्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी राखून ठेवता येणार नाही, असे स्पष्ट  केले. तसेच हे मैदान सर्वाना खुले करा असा आदेश देऊन याचिका निकाली काढली.