Fri, Sep 25, 2020 18:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिया प्रकरण : २ ड्रग्ज पेडलर्सना एनसीबीकडून अटक 

रिया प्रकरण : २ ड्रग्ज पेडलर्सना अटक 

Last Updated: Sep 15 2020 10:46AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

गोवा येथील ड्रग पेडलर ख्रिस कॉस्टा आणि सुर्यदीप यांना मुंबई एनसीबीने अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे. 

ड्रग पेडलरशी संपर्कासाठी रिया वापरायची आईचा फोन

एका रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्ती पेडलर्सशी संपर्क करण्यासाठी आपल्या आईचा मोबाइल फोन वापरायची अशी माहिती समोर आली आहे. एनसीबीने फोन जप्त केला आहे. आणि फोनमधील डेटा मिळवला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाच्या घरी एनसीबीने छापेमारी केल्यानंतर एक लॅपटॉप आणि मोबाईल फोन ताब्यात घेतला होता. हा मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या डेटातून काही खास व्हॉट्सॲप ग्रुप समोर आले होते. यामध्ये तथाकथित ड्रग चॅट होते. या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सहभागी लोकदेखील एनसीबीच्या रडारवर आहेत. 

सध्या रिया चक्रवर्ती तुरुंगात आहे. तिची जामीन अर्ज २ वेळा फेटाळण्यात आला आहे. रियाचे वकील जामीनसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करतील, असे म्हटले जात आहे. रियाशिवाय तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, जैद विलात्रा आणि अब्दुल वासित परिहार यांनादेखील अटक करण्यात आली होती. 
 

 "