Fri, Oct 02, 2020 00:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार; अरुण गवळीला आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश

अरुण गवळीला आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Last Updated: May 22 2020 7:02PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कुख्यात गुंड अरुण गवळी याला पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार देत नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचे नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. 

देशात एका दिवसात उच्चांकी ६ हजार ८८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

काही दिवसांपुर्वी पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळी याने पॅरोल वाढवून देण्यासाठी नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला होता. त्याच्यावर झालेल्या सुनावणी वेळी त्याने आपण कोणतेही गैरकृत्य तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा युक्तिवाद केला. पण न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचे उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही, असे सांगितले. 

'पीपीई किट घालून रमजानची नमाज अदा करू द्या'

तसेच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे खंडपीठाने नमूद केले. यामुळे अरुण गवळीला पुन्हा कारागृहात परतावे लागणार आहे. अरुण गवळी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

 "