Thu, Oct 29, 2020 07:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात २५,५२७ पोलिसांना कोरोना

राज्यात २५,५२७ पोलिसांना कोरोना

Last Updated: Oct 18 2020 1:08AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलीस दलावरील कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढतच असून या रोगाने आतापर्यंत 25 हजार 527 पोलिसांना ग्रासले आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या 267 पोलिसांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.

राज्य पोलीस दलातील 2 हजार 791 अधिकारी आणि 22 हजार 736 अंमलदार अशा एकूण 25 हजार 527 पोलिसांना या रोगाने ग्रासले आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, या रोगाची लागण झालेल्या 2 हजार 537 अधिकारी आणि 20 हजार 763 अंमलदार अशा एकूण 23 हजार 300 पोलिसांनी या रोगावर मात करून ते कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या 26 अधिकारी आणि 241 अंमलदार अशा एकूण 267 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, 228 अधिकारी आणि 1 हजार 732 अंमलदार अशा एकूण 1 हजार 960 पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयाने दिली आहे. महापालिकांनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका पोलिसांनाच बसला आहे.

 "