Wed, Oct 28, 2020 10:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाचा कहर राज्यभर सुरूच

कोरोनाचा कहर राज्यभर सुरूच

Last Updated: Sep 17 2020 2:14AM
मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात बुधवारी कोरोनाच्या 23 हजार 365 नव्या रुग्णांची भर पडली, तर 474 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतही 2352 रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 1 लाख 75 हजार 886 वर पोहोचली. बुधवारी दिवसभरात मुंबईत 50 जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात बुधवारी 1,795 नव्या रुग्णांचे निदान झाले, तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 51 हजार 236 झाली असून तब्बल चार हजार 9 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत.

राज्यात आतापर्यंतची रुग्णसंख्या 11 लाख 21 हजार 221 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7 लाख 92 हजार 832 जणांनी कोरोनावर मात केली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.71, तर राज्यातील मृत्युदर 2.75 टक्के आहे. राज्यात आजच्या घडीला 2 लाख 97 हजार 125 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने आपला जोर वाढवल्याचे दिसते.  पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, नागपूरात मोठी रुग्णवाढ झाली. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 82 हजार 172 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. नागपूरात 21 हजारांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्ह्यांत सरासरी प्रत्येकी 10 हजारांच्या आसपास अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात तर कोरोनाचा कहर असून, बुधवारी पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. सातार्‍यात 862, कोल्हापूरात 737, सांगलीत 999 तर नागपूरात 1974 नवे रुग्णांचे निदान झाले. नाशिकमध्ये 920, अहमदनगरमध्ये 1128, जळगावमध्ये 930, सोलापूरात 616 नवे रुग्ण आढळून आले.

 "