Tue, Sep 29, 2020 10:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिपळूणमध्ये कोरोना रुग्णाची रुग्णालयात आत्महत्या

चिपळूणमध्ये कोरोना रुग्णाची आत्महत्या

Last Updated: Aug 15 2020 1:22PM
चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

चिपळूणमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयात ४५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या रूग्णांचा 6 ऑगस्टला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आता होता. या रूग्णावर कमथे रुग्णालयात उपाचाराठी  दाखल करण्यात आले होते. कोरोना रुग्णाच्या आत्महत्येनंतर आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

उपचारादरम्यानच, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास हॉस्पिटलच्या गच्चीवर जाऊन या रुग्णाने गळफास लावून घेतल्याचे शनिवारी सकाळी उघड झाले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कोरोनाच्या भीतीने रूग्‍णाने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. 

आत्महत्या केलेला रुग्ण हा खेड तालुक्यातील आंबडस गावचा रहिवासी असल्याची  माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

 "