Sun, Sep 20, 2020 09:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'त्या' वक्तव्याने वाढली तणातणी अन् राहुल गांधींची उद्धव ठाकरेंना फोनाफोनी!

'त्या' वक्तव्याने वाढली तणातणी अन् राहुल गांधींची उद्धव ठाकरेंना फोनाफोनी!

Last Updated: May 27 2020 1:41PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशातील सर्वांत अधिक कोरोना संकट राज्यावर गडद होत चालले असताना राजकारणालाही कमालीची धार चढली आहे. त्यामुळे राज्यात एका पाठोपाठ एक राजभवन भेटी आणि आणि त्यानंतर होत असलेल्या वक्तव्यांमुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल उद्विग्नता व्यक्त केल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली. राज्यात सरकारला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

अधिक वाचा : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला 'तो' प्रस्ताव माहित आहे का?

त्यांनी काल (ता.२७) राज्यात आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे; पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपली उद्विग्‍नता व्यक्‍त केली. सरकार चालविण्यात आणि सरकारला पाठिंबा देण्यात फरक असतो असे सांगून ते म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला सहकार्य करण्याची गरज आहे. चारही टप्प्यांतील लॉकडाऊन अपयशी ठरले असून, केंद्रातील मोदी सरकारचा प्लॅन बी काय आहे, असा सवाल गांधी यांनी केला. गरजूंना साडेसात हजार रुपये देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

अधिक वाचा : तर विरोधी पक्षाला श्रीखंड पुरीचे जेवण घातले असते!

 "