Sun, Aug 09, 2020 14:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएची परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार!

सीएची परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार!

Last Updated: Jul 13 2020 5:04PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

चार्टर्ड अकौंटंट अर्थात सीएची २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून ही परीक्षा आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेत विलीन करण्यात आली आहे. याचा अर्थ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसोबत गत मे महिन्यात होऊ न शकलेली ही परीक्षा होणार आहे. 

आणखी वाचा : सीबीएसईमध्ये विद्यार्थीनींची बाजी; गतवर्षीच्या तुलनेत निकाल ५ टक्क्यांनी अधिक

सीएच्या परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजे मे आणि नोव्हेंबर महिन्यात होतात. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत होईल, असे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले होते. तथापि कोरोना संक्रमण मे महिन्याच्या तुलनेत कितीतरी जास्त वाढल्याने २९ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आयसीएआयकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. 

आणखी वाचा : 'युजीसी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का'?

मे महिन्यात होणारी परीक्षा आता थेट नोव्हेंबरमधील परिक्षेसोबत घेतली जाणार असल्याचेही आयसीएआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना संक्रमणामुळे केवळ सीएचीच नव्हे तर इतर सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा बाधित झालेल्या आहेत.

आणखी वाचा : दूरसंचार कंपन्यांना दणका; प्रीमियम योजनांना 'ट्राय'ने लावला लगाम!