Fri, Oct 02, 2020 01:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोनी कपूरच्या घरात कोरोनाचा शिरकाव

बोनी कपूरच्या घरात कोरोनाचा शिरकाव

Last Updated: May 21 2020 11:02AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. बोनी कपूर यांच्या ग्रीन एकर्स घरातील नोकराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. २३ वर्षीय तो नोकराला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या कुटूंबासह स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात बोनी कपूर राहतात. याच ठिकाणी अभिनेत्री तब्बू आणि टी व्ही अभिनेता अर्जुन बिजलानी यांचे घर आहे. 

प्रसिद्ध लोककलावंत 'नवरी नटली फेम' छगन चौगुले कालावश

१६ मेला बिघडली होती नोकराची तब्येत 

बोनी कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकर चरण साहू याची प्रकृती १६ मेला बिघडली होती. त्यानंतर त्याला तपासणीसाठी पाठवले आणि त्याला विलगिकरण कक्षात ठेवले. तपासणी केल्यानंतर जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा लगेच त्याची माहिती बीएमसीला देण्यात आली. यानंतर लगेच साहूला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले असे बोनी कपूर यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमुळे ३२ कोटी लोकांवर बेरोजगारीचे संकट

तसेच, मी, माझ्या मुली आणि घरातील सर्व स्टाफ ठीक आहोत. आमच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमच्यातील कोणीही घराबाहेर पडलेल नाही. तसेच तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट सरकार आणि बीएमसीचे आम्ही आभारी आहोत असे बोनी कपूर यांनी म्हटले आहे. 

 "