Sun, Sep 20, 2020 10:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट सेवा उद्यापासून पूर्ववत

बेस्ट सेवा उद्यापासून पूर्ववत

Last Updated: Jun 07 2020 1:02AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा-

सोमवारपासून बेस्टच्या फेर्‍या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या बसेसमध्ये 30 प्रवासी बसून, तर केवळ पाच प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. खासगी कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या 10 टक्के उपस्थितीस परवानगी मिळाल्याने सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी बेस्टचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे यामुळे बेस्ट सेववर प्रचंड ताण येऊन सोशाल डिस्टंन्सिगच्या नियमांचा फज्जा उडेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अनलॉक 1 च्या पहिल्या टप्यात परिवहन विभागाने अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांसाठी रिक्षा व टॅक्सींना परवानगी दिली. त्यानंतर आता 8 जूनपासून खासगी कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या 10 टक्के उपस्थितीस परवानगी मिळाली आहे. रेल्वे बंद असल्याने या कर्मचार्‍यांच्या वाहतुकीची जबाबदारी बेस्टने उचलली आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे बसमधील आसनव्यवस्था असणार नाही. प्रत्येक बसमध्ये एका आसनावर एकच अशाप्रकारे एकूण 30 प्रवाशांना बसून आणि पाच प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार आहे. विद्याथी,ज्येष्ठ नागरिकांना या बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. शहरातील कंटेन्मेन्ट झोन वगळता ही सेवा चालवली जाणार आहे.            

 बेस्टच्या ताफ्यात सुमारे 3,500 असून त्यातील 1500 ते 1600 बस या अत्यावश्यक सेवेसाठी सध्या रस्त्यावर धावत आहेत. या व्यतिरिक्त आणखी किमान 1500 बस तरी सुरू केल्या जातील, असे बेस्टच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. या बसमधून राज्य सरकारने परवानगी दिलेल्या व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी राखीव असलेल्या बसमध्ये इतर प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले नाही. सामान्य नागरिकांनी बसमध्ये गर्दी करू नये असे आवाहन बेस्ट प्रशासनाने  केले आहे.

पोलिसांचा ताप वाढणार?

एका बसमध्येफक्त 30 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मधल्या बसथांब्यावरील प्रवाशांना बसमध्ये कसा प्रवेश मिळणार हा प्रश्न आहेच. याशिवाय इतर प्रवासी साधने उपलब्ध नसल्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी प्रत्येक थांब्यावर प्रवाशांना रांगेत उभे करण्याचे काम पोलिसांनाच करावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांचा ताप वाढणार आहे.

बेस्टमध्ये कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यांची संख्या वाढलेली आहे. त्यातच सोमवारपासून होणार्‍या गर्दीमुळे बसचालक, वाहक यांना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी व्यक्त केली आहे.


 

 "