Wed, Oct 28, 2020 11:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांची ‘ती’ मुलाखत म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’

शरद पवारांची ‘ती’ मुलाखत म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’

Last Updated: Jul 12 2020 3:02PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

शिवसेनेचे खासदार व सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची दिर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीवरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली आहे. पवारांची ती मुलाखत म्हणजे 'मॅच फिक्सिंग' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन, असेही फडणवीस म्हणाले. आज (दि. १२) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले की, कुणीही सरकार पाडत नाही. हा सत्ताधारा-यांचाच कांगावा आहे. त्यांना कोरोनावरून राज्याच्या जनतेचे लक्ष हटवायचे आहे, असा फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनाची परिस्थीती बिकट आहे. देशातील ४६ टक्के मृतांचा आकडा आपल्या महाराष्ट्रात आहेत. अनेक मृत्युंची नोंद केलेली नाही. ६०० जणांचा मृत्यू अजूनही अपलोड केलेले नाहीत. बाधितांची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या केल्या जात आहेत, लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला.

 "