Tue, Sep 29, 2020 19:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २ लाख दिव्यांचा राम दरबार. चेतन राऊतचा १० वा विश्वविक्रम (video)

२ लाख दिव्यांचा राम दरबार. चेतन राऊतचा १० वा विश्वविक्रम (video)

Last Updated: Aug 05 2020 4:44PM
मुंबई : संघवी राजवर्धन 

ख्यातनाम, प्रतिभावंत कलाकार चेतन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कणाकीया फ्युचर सिटिमध्ये चंदन चित्तरंजन शर्मा यांच्या सहकार्याने जगातील सर्वात मोठा राम दरबार साकारला आहे.
भारताला सांस्कृतिक इतिहासाचा संपन्न असा वारसा लाभला आहे आणि हेच इतिहासाचे वैभव जीवंत ठेवण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला आहे. भारतामध्ये नवनवीन संकल्पना आणून जागतिक विक्रम करणारे मुंबईच्या पवईतील ख्यातनाम कलाकार चेतन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मातीच्या दोन लाख दिव्यांचे हे पोर्ट्रेट साकारले. एकूण ९० फूट बाय ६० फूट (म्हणजे जवळपास ५४०० चौ. फूट) च्या जागेत राम दरबाराचे भव्य असे हे पणती चित्र साकारले आहे. यामध्ये ६ रंगांच्या दिव्याचा वापर करण्यात आला आहे. (पांढरा, काळा, लाल, निळा, पिवळा, हिरवा) आणि हे पोर्ट्रेट बनविण्यासाठी चेतन यांच्यासोबत ३० मुले काम करत होती. हे चित्र साकारण्यासाठी ३ दिवस लागले.
राम दरबार साकारण्यामागची संकल्पना चेतन राऊत यांनी अगदी ठळकपणे मांडली. ते म्हणाले की, आपल्या भारताला सांस्कृतिक परंपरेचा ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे. कुटुंब संस्कृती ही भारतात मोठ्या प्रमाणावर पाहता येते. भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू राम यांच्याकडे एक आदर्श राजा म्हणून पाहिले जाते. 
सीता ही सर्वगुण संपन्न होती. तसेच सीतेशिवाय रामायण अपूर्ण राहते. कारण रामायनाचे नायक जरी राम असले तरी, घडलेल्या रामायणाची आत्मा सीता होती. ज्या सती युगात स्त्रीने कायम पुरुषांच्या मागे राहून त्यांच्यावर अवलंबून राहण्याच्या काळात सीता वनवास स्वीकारून रामासोबत राहिली. रावणाच्या लंकेतही स्वतःच्या स्त्रीत्वाचे स्वाभिमानाने, संयमाने रक्षण करत खंबीरपणे राहिली. सीतेने लव-कुशचे पालन पोषण केले आणि सीतेने स्त्री जातीसमोर आदर्श प्रस्थापित केले. 
आजच्या युगात भाऊ-भावाचा वैरी होताना आपण पाहतो. अशा वेळी आपण सर्वांनी लक्ष्मण आठवावा. लक्ष्मण हा नेहमी सुख-दु:खाच्या क्षणी रामासोबत जणू काही त्याची सावली बनून राहिला. 
हनुमानाच्या रगारगात राम होता. एकनिष्ठता आणि प्रेम यांचे मनोहारीक प्रतीक म्हणजे हनुमान. 
तेज म्हणजे राम, सीता म्हणजे धरती आणी तेजात मिळून-मिसळून गेलेला जललक्षुमी म्हणजे लक्ष्मण आणि मारुती म्हणजे साक्षात वायू. म्हणूनच या चारही तत्वांनी साकार केलंय आपल्या भारतीय संस्कृतीचं अवकाश....
भारतीय संस्कृतीत दिव्याला ही तितकेच धार्मिक महत्व व प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. दीपप्रज्वलन करून सर्व शुभ कार्याची सुरूवात केली जाते. सर्वांच्या जीवनाला तेजोमय प्रकाश लाभावा हा त्यामागचा हेतू. चेतन राऊत यांनी नऊ विश्वविक्रम  केले आहेत. याआधी कॅसेट, सीडी, कि-बोर्ड बटण, कागदी कप, रुद्राक्ष, प्लास्टिक बॉल, मातीचे दिवे. इ. वापरून रेकॉर्ड केले आहेत. तसेच चेतन राऊत हे भारताच्या इ-वेस्ट आणि बेस्ट आऊट ऑफ वेस्ट या समस्यांवर काम करत आहेत.  
 

 "