Thu, Oct 29, 2020 07:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्णब गोस्वामीची टीआरपी प्रकरणातील एफआयआर रद्द करण्यासाठी हाय कोर्टात धाव 

अर्णब गोस्वामीची टीआरपी प्रकरणातील एफआयआर रद्द करण्यासाठी हाय कोर्टात धाव 

Last Updated: Oct 18 2020 10:07PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत रिपब्लिक टीव्हीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने रिपब्लिक चॅनेल आणि त्यांच्या मालकाविरोधात विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अर्णबला समन्स बजावले असून हे समन्स रद्द करण्यासाठी अर्णबने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अर्णबला दिलासा देण्यास नकार देत याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अर्णबच्या वतीने हायकोर्टात एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच तपास निष्पक्ष व पारदर्शकपणे होण्यासाठी सदर प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 "