Sat, Aug 15, 2020 16:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिग बी अमिताभ बच्चन अखेर कोरोनामुक्त!

बिग बी अमिताभ बच्चन अखेर कोरोनामुक्त!

Last Updated: Aug 02 2020 5:21PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अखेर कोरोनामुक्त झाले असून त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमिताभ यांचे पूत्र अभिनेता अभिषेक बच्चन याने ही खुशखबर ट्विटरवरून दिली आहे. 

अभिनेते अभिषेक बच्चन यांनी ट्वितामध्ये म्हटले आहे की, माझे वडिलांची कोविड १९ ची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ते आता घरी राहून आराम करील. आपण सर्वांनी माझ्या वदिलांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. अशा भावना व्यक्त केल्या आहेत.