Tue, Sep 29, 2020 08:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात कोरोनाचा कहर सुरुच; २४ तासांत ९३३ जणांचा बळी

देशात २४ तासांत ९३३ जणांचा बळी

Last Updated: Aug 08 2020 10:12AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक सुरुच आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर ९३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : एअर इंडियाचे विमान कोसळले; २ वैमानिकांसह १८ मृत्युमुखी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे. सध्या ६ लाख १९ हजार ८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.  

गेल्या आठवड्याभरात तीन लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. सलग दहा दिवसांपासून ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे देशात कोरोना संसर्ग उच्चांकी पातळीवर पोहोचला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाचा : केरळ विमान दुर्घटनेला 'टेबलटॉप रनवे' कारणीभूत; यावर विमानाचे लँडिंग का असते धोकादायक?

देशात सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्य महाराष्ट्र आहे. देशातील एकूण बाधितांच्या संख्येपैकी एक चतुर्थांश कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ दिसून आली आहे. या चार राज्यांतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा विचार केल्यास देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५० टक्के कोरोनाबाधित येथे आहेत. 
 

 "