Wed, Oct 28, 2020 10:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ८८ टक्के कोरोनाबाधित गर्भवतींना लक्षणेच नाहीत

८८ टक्के कोरोनाबाधित गर्भवतींना लक्षणेच नाहीत

Last Updated: Sep 28 2020 1:31AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लक्षणे नसलेल्या कोरोना  रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये  गर्भवतींच्या अभ्यासात 88 टक्के केसीसमध्ये पॉझिटिव्ह कोरोनाची लक्षणे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गर्भवती महिलांच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असा निष्कर्ष पहाणीनंतर समोर आला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तसेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ - परळ’ने मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्जसह एक ‘प्रेग कोव्हिड’ नावाचा नोंदणी विभाग तयार आहे. यामध्ये राज्यातील 18 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तसेच मुंबईतील नायर रुग्णालयात येणार्‍या महिलांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

राज्यातील 15 वैद्यकीय महाविद्यालय तसेच नायर रुग्णालयातील गर्भवतींची  माहिती संकलित करण्यात आली. या काळात 1 हजार 140 महिला रुग्णालयात दाखल झाल्या. त्यामध्ये 321 महिलांना कोरोनाची लागण झाली होती. यातील केवळ 37 (11.5) टक्के महिलांना कोरोनाची लक्षणे होती, असे प्रमुख अभ्यासक तसेच आयसीएमआर- एनआयआरआरएचचे प्रमुख डॉ. राहुल गजभिये यांनी  संगितले. लक्षणे असणार्‍या महिलांना ताप, थंडी, जुलाबाच्या तक्रारी होत्या. मात्र, 88 टक्के पॉझिटिव्ह महिलांमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती.

 "