Mon, Sep 28, 2020 07:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टेन्शन वाढलं! देशातील कोरोना रुग्णसंख्या २५ लाख पार

टेन्शन वाढलं! देशातील कोरोना रुग्णसंख्या २५ लाख पार

Last Updated: Aug 15 2020 11:30AM

File Photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवीन ६५ हजार रुग्ण आढळून आले. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : गुड न्यूज! कोरोनावरील लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या एका दिवसात ६५ हजार २ रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण रुग्णसंख्या २५ लाख २६ हजार १९३ वर पोहोचली. यातील ६ लाख ६८ हजार २२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १८ लाख ८ हजार ९३७ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील मृतांचा आकडा ४९ हजारांवर गेला आहे.

वाचा : ‘रेमडेसिवीर’चे सर्वांत स्वस्त जेनेरिक औषध बाजारात

कोरोनाच्या संकटात दिलासादायक बाब म्हणजे भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या कोरोनावरील लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. ट्रायलच्या सुरुवातीच्या निष्कर्षावरुन ही लस पूर्णतः सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. भारत बायोटक आणि झायडस कॅडिला कंपनीकडून कोरोना लसीबाबत सहा शहरात ट्रायल सुरु आहे.

देशात आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात मिळवली आहे. विशेष म्हणजे देशात सध्या  २७ टक्क्यांहून अधिक सक्रिय रूग्ण आहेत. दिवसागणिक कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
 

 "