Wed, Aug 05, 2020 19:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात कोरोनाचे ६,४२९ नवे रुग्ण; १९३ जणांचा मृत्यू 

राज्यात कोरोनाचे ६,४२९ नवे रुग्ण; १९३ जणांचा मृत्यू 

Last Updated: Jul 13 2020 10:14PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात सोमवारी कोरोनाच्या 6,429 नवीन रुग्णांचे निदान झाले. 193 बाधितांचा मृत्यू झाला.  आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 42 हजार 792 चाचण्यांपैकी 2 लाख 60 हजार 924 नमुने पॉझिटिव्ह (19.43 टक्के) आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

आणखी वाचा : नवरा गर्लफ्रेंडसह 'रेंज रोव्हर'मधून जात असताना बायकोने ओव्हरटेक करुन भर रस्त्यातच...! (video)

राज्यात दिवसभरात 4,182 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.38 टक्के आहे. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्यांची एकूण संख्या 1 लाख 44 हजार 507 झाली आहे. दरम्यान, सोमवारी कोरोनाच्या 6,429 नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यात 1 लाख 5 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात 6 लाख 87 हजार 353 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 41 हजार 660 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

आणखी वाचा : दूरसंचार कंपन्यांना दणका; प्रीमियम योजनांना 'ट्राय'ने लावला लगाम!

राज्यात सोमवारी 193 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या 10,482 इतकी झाली आहे. मृतांची जिल्हावार संख्या पुढीलप्रमाणे आहे : मुंबई मनपा 47, ठाणे 5, ठाणे मनपा 23, नवी मुंबई मनपा 7, कल्याण-डोंबिवली मनपा 18, उल्हासनगर मनपा 2, भिवंडी-निजामपूर मनपा 4, वसई-विरार मनपा 6, पनवेल मनपा 5, नाशिक 1, नाशिक मनपा 9, अहमदनगर 1, अहमदनगर मनपा 1, धुळे मनपा 2, जळगाव 7, जळगाव मनपा 1, पुणे 5, पुणे मनपा 20, पिंपरी-चिंचवड मनपा 5, सोलापूर 1, सोलापूर मनपा 6, सांगली 1, सांगली-मिरज कुपवाड मनपा 2, औरंगाबाद 1, औरंगाबाद मनपा 2, लातूर 2, उस्मानाबाद 3, अकोला 2, अमरावती, वाशिम, नागपूर मनपा, भंडारा येथे प्रत्येकी एक.

आणखी वाचा : 'युजीसी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का'?