Tue, Sep 29, 2020 08:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात एका दिवसात कोरोनाने १ हजार रुग्णांचा मृत्यू

देशात एका दिवसात कोरोनाने १ हजार रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Aug 14 2020 10:10AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाबाधित मृतांच्या वाढत्या आकड्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात गेल्या २४ तासांत ६४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले, तर १००७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

वाचा : मुंबई, ठाण्यात कोरोनाची पिछेहाट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ६४ हजार ५५३ रुग्ण आढळून आले, तर १००७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशातील रुग्णसंख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे. यातील ६ लाख ६१ हजार ५९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १७ लाख ५१ हजार ५५६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत ४८ हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतली आहे.

वाचा : राज्यात कोरोनाचे ११,८१३ नवे रुग्ण

देशात आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात मिळवली आहे. विशेष म्हणजे देशात सध्या २७ टक्क्यांहून अधिक सक्रिय रूग्ण आहेत. दिवसागणिक कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

 "