Wed, Oct 28, 2020 10:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत २,२३६ नवे रुग्ण

मुंबईत २,२३६ नवे रुग्ण

Last Updated: Sep 21 2020 1:20AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत रविवारी कोरोनाच्या 2,236 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 84 हजार 313 वर पोहोचला आहे. 44 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 5038 जण बरे झाले. मृतांमध्ये 29 जणांचे वय 60 वर्षांवरील होते. 14 रुग्ण 40 ते 60 वयोगटातील तर, एक रुग्ण 40 वर्षांखालील होता.

ठाणे जिल्ह्यात रविवारी एक हजार 781 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर 27  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार 143 रुग्ण कोरोनाला बळी पडले आहेत. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 58 हजार 703 वर पोहोचला आहे. ही संख्या राज्यातील तिसर्‍या क्रमांकाची आहे. तसेच आतापर्यंत एक लाख 35 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक 26 हजार 408 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजवर एकूण 8 लाख 84 हजार 341 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.17 टक्के एवढे झाले आहे. दुसरीकडे, रविवारी राज्यात नव्याने 20 हजार 598 रुग्णांचे निदान झाले. तर, 455 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. राज्यात आजवर 33 हजारांच्या घरात नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.7 इतका आहे.

राज्यात सध्या 2 लाख 91 हजार 238 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजवर राज्यात 12 लाख 8 हजार 642 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मुंबईत 28 हजार, ठाण्यात 30 हजार, पुण्यात 75 हजार, नागपूरात 20 हजार, नाशिकमध्ये 14 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 "