Sat, Aug 08, 2020 11:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात दिवसात १,८७६ नवे रुग्ण

ठाण्यात दिवसात १,८७६ नवे रुग्ण

Last Updated: Jul 06 2020 1:31AM
मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

एमएमआर क्षेत्रात कोरोनाचे थैमान सुरूच असून, विशेषत: ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी तब्बल 1 हजार 876 नवे रुग्ण सापडले, तर 47 जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये 1311ने वाढ झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 84 हजार 125 वर पोहोचला आहे. 69 जणांचा मृत्यू झाला असून 2420 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात रविवारी कोरोनाच्या 6 हजार 555 नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या  86 हजार 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  रविवारी 3 हजार 658 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. एकूण 2 लाख 6 हजार 619 रुग्णांपैकी 1 लाख 11 हजार 740 जणांना घरी सोडण्यात आले आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.8 टक्के इतके असल्याची माहिती  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. राज्यात दिवसभरात 151 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 8 हजार 839 इतकी झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 42 हजार 418 तर, मृतांची संख्या 1 हजार 270 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.

शनिवारप्रमाणे रविवारीही कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 482 रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 86 तर, मृतांची संख्या 140 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 373 बाधितांची तर, 16 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 731  तर, मृतांची संख्या 402 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 191 रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 50 तर, मृतांची संख्या 244 वर पोहोचला आहे. त्यात मीरा-भाईंदरमध्ये 303 रुग्णांची तर, चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 314 तर, मृतांची संख्या 162 इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 69 बधीतांसह एक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 319 तर,मृतांची संख्या 120 वर पोहोचली. उल्हासनगर 251 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 810 तर,मृतांची संख्या 53 झाली आहे. अंबरनाथमध्ये 74 रुग्णांची तर, 12 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 196 तर, मृतांची संख्या 70 झाली आहे. बदलापूरमध्ये 21 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 973 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 112 रुग्णांची तर, तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 192 तर, मृतांची संख्या 61 वर गेली आहे.

आज फडणवीस काय बोलणार?

एमएमआरमधील कोरोनाग्रस्त शहरांचा दौरा पूर्ण केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी दुपारी तीन वाजता ठाण्यात खास पत्रकार परिषद घेणार राज्य सरकार आणि एकूण यंत्रणेचा पर्दाफाश करणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात कोरोनाचा कहर का निर्माण झाला ? यास जबाबदार कोण ? रुग्णांची स्थिती नेमकी काय आहे आणि या संकटात सरकार नेमके कुठे आहे यावर ते प्रकाश टाकण्याची शक्यता आहे . यापूर्वी सरकारने कोरोनाचे मृत्यू लपवले आणि रुग्णसंख्या कमी दिसावी म्हणून चाचण्या घटवण्यात आल्याचे प्रकरण फडणवीस यांनी उघड केले होते. आता ठाणे, कल्याण , भिवंडीतील कोरोना उद्रेकावर ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.