Fri, Aug 14, 2020 15:55होमपेज › Marathwada › वटपौर्णिमेला केले वटवृक्षाचे रोपण

वटपौर्णिमेला केले वटवृक्षाचे रोपण

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 12:03AMपाटोदा ः प्रतिनिधी

पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी श्रद्धेच्या भावनेतून महिला वटपौर्णिमेला झाडाची पूजा करतात. सौताडा येथील मजूर महिलांनी ज्या वृक्षांपासून माणसाला ऑक्सिजन मिळतो व जे वृक्ष माणसांना दीर्घायुष्य देतात अशा वृक्षांची वटपौर्णिमेच्यानिमित्ताने लागवड करून पूजा केली व खर्‍या अर्थाने या महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली .

सौताडा येथील रामेश्‍वर दरा परिसरात वनविभागातर्फ विविध कामे सुरू आहेत त्या ठिकाणी अनेक महिला रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतात. बुधवारी सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा साजरी केली. या वनमजूर महिलांनी मात्र अत्यंत अनोख्या पद्धतीने व दूरदृष्टीचा विचार  करून  हा सण साजरा केला.  उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा देणारी झाडे असली पाहिजेत, हा विचार समोर ठेवून वृक्षलागवडीचा संकल्प केला. हा संकल्प  बुधवारी प्रत्यक्षात आणला. या महिलांमध्ये  रेखा राळेभात, सरुबाई पवार, आसरबाई सागळे, सुभद्रा सानप, ताई शिंदे, चंद्रकला सानप,  दैवा सानप, संगीता शिंदे, कांताबाई शिंदे, राजर्षी जाधव, चंद्रकला शिंदे, पाबू पेचे आदींचा समावेश आहे.