Tue, Aug 04, 2020 10:32होमपेज › Marathwada › निजाम राजवटीतही बंद न झालेलं तुळजाभवानी मंदीर कोरोनामुळे झाले निर्मनुष्य!

निजाम राजवटीतही बंद न झालेलं तुळजाभवानी मंदीर कोरोनामुळे झाले निर्मनुष्य!

Last Updated: Jul 12 2020 1:28AM

तुळजाभवानी मंदिरात भाविकांना प्रवेशबंदी असल्यामुळे गोमुख तीर्थ आणि निंबाळकर दरवाजा दरम्यान काढलेले हे छायाचित्रतुळजापूर : डॉ. सतिश महामुनी

ज्या तुळजाभवानी मंदिरात हजारो भाविक दररोज तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या निमित्ताने मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने खचाखच भरलेला असते तेच तुळजाभवानी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनास बंदी केल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून निर्मनुष्य बनले आहे. मंदिर परिसराची ही अवस्था मंदिराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच झाली आहे.

वाचा : माजलगाव : आ.प्रकाश सोळंकेंकडून सोशल डिस्टन्सिंग जमावबंदीचे उल्लंघन

निजाम राजवटीमध्ये निजामाच्या जुलमी राजवटी खाली उस्मानाबाद जिल्हा वावरत होता, तेव्हा तुळजापूर तीर्थक्षेत्र एकादाही बंद केले गेले नाही, अथवा भाविकांना केव्हाही दर्शनाची बंदी झाली नव्हती परिणामी हे मंदिर सदैव भाविक भक्तांच्या उपस्थितीने आणि गर्दीने फुलून राहिले गेले आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने भाविकांना दर्शन बंद केल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश देण्‍यात आलेला नाही. त्यामुळे मंदिर परिसरातील सर्व ठिकाणी मोकळे मैदान असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.

तुळजाभवानी मंदिरात नित्य पूजा सुरू आहे. मात्र त्याला केवळ प्रशासनाची मंजुरी असणारी पुजारी आणि इतर आवश्यक सेवेकरी यांची उपस्थिती आहे. याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. तसेच मंदिरामध्ये असणाऱ्या निर्मनुष्य स्थितीप्रमाणे तुळजाभवानी देवीच्या राजे शहाजी महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार याच्या समोर देखील दिवस आणि रात्र असणारी गर्दी आज लुप्त झाली आहे. वर्ग आणि व्यापारी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भाड्याने दुकान करणारे दुकानदार भाडे भरू शकत नाहीत, अशी वास्तव स्थिती आहे. त्यांना बंद काळात पूर्णतः माफ करण्याची अपेक्षा आहे.

वाचा :दहावी, बारावीचा निकाल 'या' तारखेला लागणार!