Sat, Aug 08, 2020 11:22



होमपेज › Marathwada › बीड : गावठी पिस्तूलासह दोघांना पकडले

बीड : गावठी पिस्तूलासह दोघांना पकडले

Last Updated: Jul 04 2020 10:04AM

संग्रहित छायाचित्र



अग्रवाल लॉजजवळ एलसीबी पथकाची कारवाई

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा 

गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसासह एलसीबीच्या पथकाने भरदिवसा दोघांना ताब्यात घेतले. ही खळबळजनक घटना अग्रवाल लॉजजवळ घडल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील अग्रवाल लॉजजवळ दोघेजण गावठी पिस्तूल आणि काडतुसासह असल्याची माहिती मिळाल्यावरून एलसीबीच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले, जमादार भास्कर केंद्रे, मुंजा कुंवारे, विकास वाघमारे, नरेंद्र बांगर, रामदास तांदळे, चालक अतुल हराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एलसीबीच्या पथकाने ज्ञानोबा मारोती गित्ते (गोट्या), आनंद जय अग्रवाल या दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.