किल्ले धारूर : प्रतिनिधी
धारुर तालुक्यातील चाटगांव येथील साठवण तलावात तरुणीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. वैशाली तुळशीराम चौरे (वय, 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल(१६ जुलै) सकाळी वैशाली शेतात कापूस खुरपणीसाठी आली होती. ती घरी परत न गेल्याने सासरा रामभाऊ बाबुराव चौरे यांनी सुन हरवल्याची तक्रार दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान नातेवाईकांनी शेताशेजारी असलेल्या साठवण तलावाजवळ मयत वैशालीची चप्पल आढळून आल्याने तिचा तलावात शोध घेतला असता. यावेळी ती तलावाच्या सखोल भागात आढळून आली.
दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत अंबाजोगाई येथिल शाशकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. पुढिल तपास दिंद्रुड पोलिस ठाण्याचेचे पोलिस उपनिरीक्षक दंडे, पोलिस जमादार चौरे, सोनवणे, वनवे करत आहेत.
माहेरच्या नातेवाईकांचा घातपाताचा संशय
घटनास्थळी मयत वैशालीच्या माहेरचे नातेवाईक दाखल झाले असून, चाटगांव साठवण तलाव परिसरात नातेवाईकांनी आक्रोश करत वैशालीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.