Sat, Aug 15, 2020 16:44होमपेज › Marathwada › हिंगोली दूध आंदोलन; आमदार मुटकुळेंना अटक व सुटका 

हिंगोली दूध आंदोलन; आमदार मुटकुळेंना अटक

Last Updated: Aug 01 2020 12:51PM
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात शेतकऱ्यांना दुधाला दहा रुपये दर वाढवून द्यावा यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी (दि. १) महाराजा अग्रसेन चौकात आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

हिंगोली शहरातील महाराजा अग्रसेन चौकात भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने सकाळी अकरा वाजता आंदोलन सुरु केले. यावेळी बाजार समिती संचालक प्रशांत सोनी, मिलिंद यंबल, अॅड. के.के. शिंदे, बाजार समिती सभापती हरिश्‍चंद्र शिंदे, उमेश नागरे संजय ढोके, डॉ. वसंतराव देशमुख, अॅड. अमोल जाधव, रिपाईचे मराठवाडा अध्यक्ष दिवाकर माने श्याम खंडेलवाल, बाबा घुगे, हमिद प्यारेवाले यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यामध्ये गाईच्या दुधाचा दर १० रुपये वाढवून द्यावा तसेच दूध भुकटीसाठी ५० रुपये किलो प्रमाणे अनुदान द्यावे यासह इतर मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. भाजपच्या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अखील सय्यद, जमादार शेख खुद्दुस, लक्ष्मीकांत माखणे यांच्यासह पोलिस पथकाने आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेले. दुपारी उशिरापर्यंत त्यांना पोलिस ठाण्यातच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. त्यानंतर काहीवेळाने त्याची सुटका करण्यात आली.