Sat, Feb 27, 2021 06:22होमपेज › Marathwada › राष्‍ट्रवादीच्या सभेत एकावर कोयत्‍याने वार 

राष्‍ट्रवादीच्या सभेत एकावर कोयत्‍याने वार 

Published On: Mar 29 2019 11:05PM | Last Updated: Mar 29 2019 11:05PM
धारूर  (जि. बीड ) : वार्ताहर

धर्माळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बंजरंग सोनवने यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी जि. प. सदस्य सारिका सोनवने यांची सभा सुरू असताना एकाने कोयता हातात घेऊन गोंधळ घातला. या झटापटीत एक जण जखमी झाला आहे.  हल्‍लेखोराने दोन मोटरसायकलचीही मोडतोड केली असून, या घटनेमुळे सभेत एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर हल्‍लेखोर घटनास्‍थळावरुन पसार झाला आहे. त्‍याच्या विरूध्द धारूर पोलिस ठायात तक्रार दिली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रीया सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्माळा येथे सारिका सोनवणे यांची सभा सुरू असताना गणेश मिठू कदम हा सभेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घालू लागला. त्याच्या हातात कोयता होता. त्याने तेथे उभ्या असणाऱ्या दोन मोटरसायकलची मोडतोड केली. हात कोयता घेऊन सभेच्या दिशेने जात असताना ग्रामस्थानी त्याला अडवण्याचा  प्रयत्न केला. यावेळी त्‍याने वैजनाथ भैरूनाथ सोळंके यांच्यावर वार केला. यात सोळंके हे जखमी झाले आहेत.