Tue, Aug 04, 2020 10:36



होमपेज › Marathwada › माजलगाव : आ.प्रकाश सोळंकेंकडून सोशल डिस्टन्सिंग जमावबंदीचे उल्लंघन

माजलगाव : आ.प्रकाश सोळंकेंकडून सोशल डिस्टन्सिंग जमावबंदीचे उल्लंघन

Last Updated: Jul 12 2020 1:28AM




माजलगाव : पुढारी वृत्तसेवा

माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या जमावबंदीसह सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीक कर्ज वाटप करण्याच्या राजकीय धुंदीत कोरोना महामारीला निमंत्रण देणाऱ्या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी केली आहे.

दहावी, बारावीचा निकाल 'या' तारखेला लागणार!

तालुक्यातील सादोळा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीयीकृत बँकेचे शाखाधिकारी संदीप कुमार व फिल्ड ऑफिसर बालाजी यांना बोलवण्यात आले. महामारीचे भयंकर संकट घोंगावत असताना आ.प्रकाश सोळंके यांनी यावेळी राजकीय स्टंट केल्याने कर्ज वाटपाच्या निमित्त मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. या वाढलेल्या गर्दीमुळे राज्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे तीन-तेरा वाजले, तर सोशल डिस्टंसिंगचा ही फज्जा उडाला. यामुळे तालुक्यात कोरोना महामारीचा धोका वाढला आहे.

एका जबाबदार लोकप्रतिनिधींकडून राजकीय स्टंटच्या हव्यासापोटी आपल्या नागरिकांप्रती बेजबाबदारपणा दिसून आला. अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी केली आहे. याबाबत गुन्हे दाखल न केल्यास भाजप कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

हिंगोली : वर्षा गायकवाड यांची संवदेनशीलता, केली अपघात ग्रस्ताला मदत

सत्ताधारी आमदारावर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनासमोर आव्हान

सर्वसामान्यांना नियमांच्या कचाट्यात अडकून आतापर्यंत माजलगाव शहरात अनेकांवर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गर्दीच्या कारणामुळे गुरूवारी (दि.१०) शहरातील पाच व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नियमाची पायमल्ली करणाऱ्या एका डॉक्टरसह १५ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी नियमांचे मोजमाप करणाऱ्या प्रशासनासमोर या घटनेतून सत्ताधारी आमदारावर गुन्हे दाखल करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

अधिक वाचा : बीड: विमा कंपन्यांनी निविदा भरल्‍याच नाहीत