होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : तीन मालवाहू गाड्यांचा भीषण अपघात; दोघे ठार 

उस्मानाबाद : तीन मालवाहू गाड्यांचा भीषण अपघात; दोघे ठार 

Published On: Jun 21 2019 5:54PM | Last Updated: Jun 21 2019 5:54PM
पारगाव : प्रतिनिधी

वाशी तालुक्यातील पारगाव येथील राष्ट्रीय महामार्ग तीन मालवाहू गाड्यांचा भीषण अपघात झाल. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आज, शुक्रवार (दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. 

औरंगाबाद सोलापूर रोडवर मांजरा नदीच्या उत्तरेकडे 500 मिटर अंतरावर एन.एच.आय.ने चौपदरीकरण व दोन पदरी रस्ता जोडण्यासाठी ओपनिंग ठेवलेले आहे. आज, शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास आयशर टेंम्पो क्रमांक (एम.एच.-20 डी.ई.-7738) औरंगाबाद येथून शॉक अँप घेऊन बेंगलोर ला निघाला होता. त्याच्या मागे जालना येथून लोखंडचे रॉड भरून येणाऱ्या गाडी क्रमांक (एम.एच.-14- सि.पी.-6981) ने पाठीमागून आयशर टेम्पोला जोराची धडक दिल्याने टेम्पो जाग्यावर पलटी झाला. याचवेळी मागून धडक दिलेल्या गाडीला सोलापूर हुन औरंगाबाद कडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक (एच.आर.-47-सी.-2837) ने समोरुन जोराची धडक दिली. 

अशा या विचित्र अपघातात कंटेनर मधील चालक व क्लिनर जखमी झाले. आयशर टेम्पो मधील चालक सतीश कचरू जाधव व क्लिनर  सतीश खरे हे दोघेही जखमी झाले. तर लोखंडी रॉड घेऊन जाणारी गाडीतले सर्व रॉड या अपघातात समोर आले व त्यागाडीचे इंजिन, कॅबिन व बॉडी पूर्णपणे फुटली होती. यात समोरील गाडीचा चालक व गाडी मालक या अपघातात ठार झाले. या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीना बीड येथे पाठवलेलं असल्यामुळे नावे समजू शकलेली नाहीत. तर कंटेनर मधील ही चालक घटनास्थळी उपलब्ध नसल्याने त्याची ही नावे समजू शकली नाहीत. या अपघातामुळे दोन्ही बाजूला दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागलेली होती. आय.आर.बी.चे कर्मचारी व पोलिस प्रशासन यांनी ही वाहतूक सुरळीत केली.