होमपेज › Marathwada › धनंजय मुंडेंच्या प्रॉपर्टीवरील निर्बंध न्यायालयाने हटवले

धनंजय मुंडेंच्या प्रॉपर्टीवरील निर्बंध न्यायालयाने हटवले

Published On: Oct 06 2018 1:43AM | Last Updated: Oct 05 2018 12:58AMअंबजोगाई : प्रतिनिधी

संत जगमित्र नागा सूतगिरणीच्या थकीत कर्जप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रॉपर्टीवर निर्बंध लावण्यात आले होते. अंबाजोगाई न्यायालयाच्या या निकालास स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला.

अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी पाच सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र नागा सूतगिरणीसंदर्भात सूतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमूद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही, असे म्हटले होते. याप्रकरणी मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करून या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती.

सदर कारवाई करताना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली, गृहमंत्रालयाकडून याबाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्रेत संज्ञेप्रमाणे न केल्यामुळे तसेच याप्रकरणी कोणतीही नोटीस न मिळाल्याने प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या निर्णयास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती.