Tue, Aug 04, 2020 11:29होमपेज › Marathwada › जिंतूर ते परभणी बंद महामार्ग कामासाठी स्वाक्षरी मोहीम

जिंतूर ते परभणी बंद महामार्ग कामासाठी स्वाक्षरी मोहीम

Published On: May 20 2019 4:48PM | Last Updated: May 21 2019 1:49AM
जिंतूर : प्रतिनिधी

शहरात आज (ता. २०) सकाळपासूनच  बसस्थानक परिसरात जिंतूर परभणी महामार्ग जनआंदोलन समितीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्‍यात येत आहे. 

जिंतूर ते परभणी महामार्गावर चौपदरीकरण बंद पडून रखडलेले काम पूर्ववत संबंधित यंत्रणेने तसेच प्रशासनाने तात्काळ सुरू करावे.  यासाठी शहरातील  नागरिकांतर्फे व संघर्ष जनआंदोलन समितीच्या माध्यमातून या पूर्वीच शहरात सर्वानुमते सर्व समावेशक राजकीय विरहित बैठक घेऊन चार टप्प्यात जनजागृती करून विविध आंदोलने करण्याचे ठरले.  प्रथमच जिल्हाधिकारी यांना याबाबत लेखी निवेदनात नमुद करून निवेदन स्वाक्षरी मोहीम राबऊन विभागीय आयुक्त यांना निवेदन,  रास्ता रोको, जेलभरो व  जिंतूर बंदची हाक देण्यात आलेली आहे.  हे सर्व आंदोलनाचे मार्ग अवलंबून सरते शेवटी या रखडलेल्या चौपदरी रस्त्याच्या कामासाठी एक संघर्ष समितीकडून जनहित याचिका  कोर्टात दाखल करण्याचा मनोदय केलेला आहे.  

   आज याच आंदोलनाचा टप्पा म्हणून शहराच्या विविध भागात सर्वसामान्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीम राबवण्यात आली.  या स्वाक्षरी महिमेस सर्व शहराच्या विविध भागातुन उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी स्वाक्षऱ्या देऊन दिला आहे.  याचसोबत जिंतूर ते परभणी या ४२  किमी मार्गावर बोरी व झरी ही मोठी वस्ती लोकसंख्या असलेल्या गावामध्ये सुद्धा स्वाक्षरी महिमेस उत्तम प्रतिसाद भेटला आहे. 

 लोकप्रतिनिधींचे मौनवृत्त चक्रावणारे

  परभणी ते जिंतूर या चौपदरीकरणच्या रखडलेल्या व बंद पडलेल्या कामाची तात्काळ सुरवात  येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी  व्हावी व या  हेतूने शहरातील नागरिकांनी एकत्र येत जनसंघर्ष आंदोलन समितीच्यावतीने या विविध चार टप्प्याच्या आंदोलनाचे रणसिंग फुकलेलं आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व खाजदार यांनी या लोकांच्या महत्वाच्या प्रश्नावर मौनवृत्त धारण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत संभ्रम निर्माण झालेला आहे.

   यासारख्‍या प्रश्नावर वरिष्ठ प्रशासकीय मंत्रालय आदी स्तरावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे अपेक्षित असते,  अशावेळी  प्रतिक्रिया जनसामन्यात उमटू लागल्या आहेत. कारण वेळोवेळी लोकप्रतीनिधीकडून टाळे बंद आंदोलन,  सीएम भेट,  आयुक्त भेट, पदयात्रा,  आंदोलन,  उपोषण आदी  जनसामान्यांच्या प्रश्नासाठी करतात.  यापूर्वीच जिल्ह्यातील सर्वच पक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळाने परभणी शहरात मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी एकोपा दाखवला होता. तसा एकोपा परभणी ते जिंतूर या चौपदरीकरनाच्या रखडलेल्या व बंद पडलेल्या कामासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी चुप्पी का साधली आहे, असा प्रश्‍न सर्वसामान्‍यांच्‍याकडून विचारला जात आहे.