Sun, Aug 09, 2020 04:38होमपेज › Marathwada › राष्‍ट्रवादीचं अनोखं आंदोलन; जिल्‍हाधिकर्‍यांच्या दारात शिजली पिठलं-भाकर(Video)

राष्‍ट्रवादीचं अनोखं आंदोलन; जिल्‍हाधिकर्‍यांच्या दारात शिजली पिठलं-भाकर(Video)

Published On: Jun 04 2018 2:22PM | Last Updated: Jun 04 2018 4:08PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी पिठलं भाकरी शिजवून केंद्र सरकारचे या समस्येकडे लक्ष वेधले. मोर्चात सहभागी महिलांनी प्रचंड घोषणाबाजी करीत भाजप सरकारचा निषेध केला.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात महागाई अनेक पटीने वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल १४७ रुपये प्रती बॅरल असतानाही २००८ मध्ये युपीए सरकारने पेट्रोलचे दर ५५ तर डिझेल दर ३८ रुपये प्रतिलिटर इतकाच ठेवला होता. कच्चे तेल ६५ रुपयांवर येऊनही पेट्रोल ८६ तर डिझेल ७३ रुपयांना विकले जात आहे. करांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकार लूट करीत असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला. गॅस सिलिंडरही ७१४ रुपयांवर गेले आहे. 

रेशन दुकानातून धान्यही मिळत नाही. जिल्हा रुग्णालयात औषधे उपलब्ध नाहीत. यातून सरकारने नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करुन महिला राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी तीन चुली मांडल्या. त्यावर भाकरी आणि पिठलं शिजवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. नंदा पुनगुडे, सक्षणा सलगर, वंदना डोके यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील हेही सहभागी झाले होते.
 

Tags : osmanabad, osmanabad news, marathwada, marathwada news, NCP women wing,protest against modi government, issue of inflation,cooked pithl bhakri,collector office