Sat, Aug 15, 2020 13:00होमपेज › Marathwada › जालना : घरफोडीचा छडा लावण्यात एलसीबीला यश

जालना : घरफोडीचा छडा लावण्यात एलसीबीला यश

Published On: Nov 03 2018 3:11PM | Last Updated: Nov 03 2018 1:55PMजालना : प्रतिनिधी

भरदिवसा झालेल्या घरफोडीतील रिव्हॉल्व्हर १९ राऊंडसह जप्त. ११ सप्टेंबर रोजी भरदुपारी घरफोडीची  घटना घडली होती. घरफोडीत एक रिव्हॉलव्हर, राउंड, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास झाला होता. गणेश भवर यांचे सोनलनगरमधील घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे होते. 

तब्बल दोन महिन्यानंतर या घरफोडीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. औरंगाबाद येथून स्वप्नील उर्फ मोगली कुलकर्णी याच्या मुसक्या आवळून त्याच्या ताब्यातून एक रिव्हॉल्व्हर आणि १९ राउंड जप्त केले. पोलिस आणखी एका आरोपीच्या शोधात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचे काम पाहिले व आरोपिला शोधून काढल्‍याची कामगिरी केली.