Fri, Aug 14, 2020 16:23होमपेज › Marathwada › अजित पवार सिंहासन नाकारतात तेव्हा!

अजित पवार सिंहासन नाकारतात तेव्हा!

Published On: Jan 21 2018 2:15PM | Last Updated: Jan 21 2018 2:15PMउमरी :प्रतिनिधी 

राजकारणात जे काही करायचे ते सत्तेसाठी अन् खुर्चीसाठीच. असे बोलले जात असले तरी अजित पवार यांच्या सारखा मोठा नेता जेंव्हा सिंहासन नाकारतो तेव्हा मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. मराठवाड्याच्या दैाऱ्यावर असलेले अजीत पवार यांनी एका कार्यक्रमात सिंहासन नाकारले. 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यात  हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सभेसाठी अजित पवार आणि अन्य नेत्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. व्यासपीठावर मध्यभागी एक राजेशाही सिंहासनासारखी महाराजा खुर्ची मांडली होती. तर बाजूला साध्या  खुर्च्या होत्या. स्थानिक नेत्यांनी पवार यांना त्या राजेशाही खुर्ची वर बसण्याचा आग्रह केला. मात्र पवार यांनी तीथे बसण्यास स्पष्ट नकार दिला. ‘ती महाराजा खुर्ची आधी उचला’ असा आदेश त्यांनी दिला . आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांनी ती खुर्ची हटवली आणि पवार यांनी साध्या खुर्चीवर बसने पसंद केले. अजित पवार यांच्या या साधेपणाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.